The Great Maharashtrian Persons who Contributed his Life For acting
शुक्रवार, १४ नोव्हेंबर, २०१४
कुसुमाग्रम -वि.वा.शिरवाडकर
कुसुमाग्रम -वि.वा.शिरवाडकर
पुण्यामध्ये जन्म झालेला असला, तरी त्यांचे शिक्षण नाशिक येथे झाले. बी.ए. झाल्यानंतर काही काळ त्यांनी चित्रपट व्यवसायात पटकथा लेखन, छोट्या भूमिका करणे अशी कामे केली. नंतर स्वराज्य, प्रभात, नवयुग, धनुर्धारी अशा विविध नियतकालिकांचे, वृत्तपत्रांचे संपादक म्हणून त्यांनी काम केले.
सामाजिक अन्याय व विषमता यांवर त्यांच्या लेखणीने कठोर प्रहार केला. ‘साहित्यिकाने सामाजिक बांधिलकी मानली पाहिजे’, या मताचे ते पुरस्कर्ते होते आणि ते त्यांनी आपल्या कृतीतून व लेखनातून वारंवार प्रकट केले. १९३२ साली काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहात त्यांचा सहभाग होता. १९३३ साली त्यांनी ध्रुव मंडळाची स्थापना केली. अनेक सामाजिक चळवळीत, सत्याग्रहांमधे सहभाग घेतला. पुढील काळातही त्यांनी नाशिक जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सहकार्य केले.
जीवनलहरी (१९३३) हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह. त्यानंतर विशाखा (१९४२), किनारा (१९५२), मराठी माती, वादळवेल, मुक्तायन, पाथेय (१९६०), स्वगत (१९६२), हिमरेषा (१९६४), वादळवेल (१९६९), मारवा (१९९९) असे त्यांचे एकाहून एक सरस असे काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले. तर दुसरा पेशवा (१९४७), वैजयंती, राजमुकूट, कौंतेय, आमचं नाव बाबुराव, ययाति आणि देवयानी, वीज म्हणाली धरतीला, नटसम्राट ही नाटके त्यांनी लिहिली. ‘नटसम्राट’ या नाटकासाठी त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. ‘नटसम्राट’ मधील मध्यवर्ती भूमिका करण्यात आजही मराठी नाट्यसृष्टीतील कलावंत धन्यता मानतात. ती भूमिका आव्हानात्मक मानली जाते.
वैष्णव, जान्हवी, कल्पनेच्या तीरावर अशा कादंबर्या, तर फुलवाली, काही वृद्ध काही तरुण, प्रेम आणि मांजर, बारा निवडक कथा असे त्यांचे काही कथासंग्रहही प्रसिद्ध आहेत. समिधा हा मुक्तकाव्यसंग्रह , तसेच ‘आहे आणि नाही’, विरामचिन्हे, वाटेवरच्या सावल्या, प्रतिसाद हे ललित लेखसंग्रह अशी त्यांची विपुल साहित्यसंपदा आहे.
‘अनंत आमुची ध्येयासक्ती, अनंत अन् आशा, किनारा तुला पामराला’ (कोलंबसाचे गर्वगीत) किंवा ‘गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार’ असे ओजस्वी, तेजस्वी शब्द वापरून त्यांनी मनामनात जसा क्रांती-जोष भरला, तसाच पृथ्वीचे प्रेमगीत, काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्यांचे हात... अशी विलक्षण हळुवार, तरल कविता लिहून प्रेमाचा संदेश मराठी मनामनापर्यंत पोहोचवला. ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ ह्या कवितेतून त्यांनी अक्षरश: इतिहासही जिवंत केला. पुढे ‘स्वातंत्र्यदेवतेची विनवणी’ लिहून भारतमातेची व्यथा जनतेसमोर मांडली, लोकांच्या डोळ्यात अंजन घातले.
केशवसुत, मर्ढेकर, गोविंदाग्रज, सावरकर, रविकिरण मंडळातील कवी... आदी कवींचा प्रभाव कुसुमाग्रजांवर होता. तो प्रभाव, तो संस्कार घेऊन त्यांनी पुढे स्वत:ची एक काव्यधारा निर्माण केली. सामाजिक कविता, देशभक्तीपर कविता, प्रेम-विरहपर कविता, ऐतिहासिक प्रसंगांचे वर्णन करणार्या कविता, आध्यात्मिक आशायाच्या कविता, निसर्गकविता असे सर्व कविताप्रकार त्यांनी लीलया हाताळलेले दिसतात.
त्यांच्या ‘विशाखा’ ह्या काव्यसंग्रहावर मराठी रसिकांनी मनापासून प्रेम केले. ऐन स्वातंत्र्यलढ्यात (१९३० ते १९४०) या संग्रहातील कविता त्यांनी लिहिल्या होत्या. अक्षरश: पूर्ण काव्यसंग्रह पाठ असणारे अनेक रसिक आजही सापडतील, अशी त्यांच्या विलक्षण प्रतिभेची आणि लोकप्रियतेची किमया आहे. घाटबंद-रेखीव-प्रमाणबद्ध रचना, कल्पनावैभव, उत्कटता, चिंतनशीलता, राष्ट्रीयता, समाजाभिमुखता ही त्यांच्या सर्वच प्रकारच्या लेखनाची वैशिष्ट्ये होत. त्यांच्या या लेखनसेवेचा यथोचित गौरव ज्ञानपीठ पुरस्कार (१९८७-८८) देऊन करण्यात आला. हा साहित्य क्षेत्रातील देशातील सर्वोच्च पुरस्कार मिळवणारे ते दुसरे मराठी साहित्यिक होत.
इतरही अनेक मानाचे पुरस्कार त्यांना लाभले. ‘तात्यासाहेब’म्हणून महाराष्ट्राला सुपरिचित असणार्या कुसुमाग्रजांनी मुंबई येथे योजलेल्या पहिल्या जागतिक मराठी परिषदेचे (१९८९) अध्यक्षपद भूषवले. त्या आधी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे (१९६४,गोवा) आणि नाट्य संमेलनाचे(१९७०,कोल्हापूर) अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते. सन २००३मध्ये तत्कालीन केंद्र सरकारने कुसुमाग्रजांच्या स्मृत्यर्थ टपाल तिकिटाचे अनावरण केले. असा बहुमान मिळवणारे ते पहिलेच मराठी साहित्यिक होत. जागतिक मराठी परिषदेच्या वतीने तसेच मराठीवर प्रेम करणार्या अनेक संस्था-संघटनांच्या वतीने २७ फेब्रुवारी हा त्यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा दिवस’ म्हणून साजरा केला जातो.
कुसुमाग्रजांच्या रूपाने मराठी साहित्याचा आणि संस्कृतीचा मानदंड महाराष्ट्राला लाभला असे मानले जाते ते उचितच आहे.
केशवसुत, मर्ढेकर, गोविंदाग्रज आदी
प्रवर्तक कवींच्या परंपरेचा वारसा चालवून, पुढे स्वत:चे अस्तित्व व
श्रेष्ठत्व सिद्ध करून एक स्वतंत्र काव्य-प्रवाह निर्माण करणारे कवी!
एक श्रेष्ठ कवी म्हणून कुसुमाग्रज तथा वि.वा. शिरवाडकर जेवढे लोकप्रिय
होते, तेवढेच ते नाटककार म्हणूनही लोकप्रिय होते. कविता, नाटक, कादंबरी,
कथा, लघुनिबंध असे विविध वाङ्मयप्रकार कौशल्याने हाताळून त्या सार्या
प्रांतांत आपल्या प्रतिभेचा दरारा निर्माण करणारे एक उच्च प्रतिभासंपन्न साहित्यिक म्हणजे
कुसुमाग्रज होत. त्यांचे मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर असे होते. परंतु
त्यांचे काका -वामन शिरवाडकर यांनी त्यांना दत्तक घेतल्याने त्यांचे नाव
विष्णू वामन शिवाडकर असे झाले.पुण्यामध्ये जन्म झालेला असला, तरी त्यांचे शिक्षण नाशिक येथे झाले. बी.ए. झाल्यानंतर काही काळ त्यांनी चित्रपट व्यवसायात पटकथा लेखन, छोट्या भूमिका करणे अशी कामे केली. नंतर स्वराज्य, प्रभात, नवयुग, धनुर्धारी अशा विविध नियतकालिकांचे, वृत्तपत्रांचे संपादक म्हणून त्यांनी काम केले.
सामाजिक अन्याय व विषमता यांवर त्यांच्या लेखणीने कठोर प्रहार केला. ‘साहित्यिकाने सामाजिक बांधिलकी मानली पाहिजे’, या मताचे ते पुरस्कर्ते होते आणि ते त्यांनी आपल्या कृतीतून व लेखनातून वारंवार प्रकट केले. १९३२ साली काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहात त्यांचा सहभाग होता. १९३३ साली त्यांनी ध्रुव मंडळाची स्थापना केली. अनेक सामाजिक चळवळीत, सत्याग्रहांमधे सहभाग घेतला. पुढील काळातही त्यांनी नाशिक जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सहकार्य केले.
जीवनलहरी (१९३३) हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह. त्यानंतर विशाखा (१९४२), किनारा (१९५२), मराठी माती, वादळवेल, मुक्तायन, पाथेय (१९६०), स्वगत (१९६२), हिमरेषा (१९६४), वादळवेल (१९६९), मारवा (१९९९) असे त्यांचे एकाहून एक सरस असे काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले. तर दुसरा पेशवा (१९४७), वैजयंती, राजमुकूट, कौंतेय, आमचं नाव बाबुराव, ययाति आणि देवयानी, वीज म्हणाली धरतीला, नटसम्राट ही नाटके त्यांनी लिहिली. ‘नटसम्राट’ या नाटकासाठी त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. ‘नटसम्राट’ मधील मध्यवर्ती भूमिका करण्यात आजही मराठी नाट्यसृष्टीतील कलावंत धन्यता मानतात. ती भूमिका आव्हानात्मक मानली जाते.
वैष्णव, जान्हवी, कल्पनेच्या तीरावर अशा कादंबर्या, तर फुलवाली, काही वृद्ध काही तरुण, प्रेम आणि मांजर, बारा निवडक कथा असे त्यांचे काही कथासंग्रहही प्रसिद्ध आहेत. समिधा हा मुक्तकाव्यसंग्रह , तसेच ‘आहे आणि नाही’, विरामचिन्हे, वाटेवरच्या सावल्या, प्रतिसाद हे ललित लेखसंग्रह अशी त्यांची विपुल साहित्यसंपदा आहे.
‘अनंत आमुची ध्येयासक्ती, अनंत अन् आशा, किनारा तुला पामराला’ (कोलंबसाचे गर्वगीत) किंवा ‘गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार’ असे ओजस्वी, तेजस्वी शब्द वापरून त्यांनी मनामनात जसा क्रांती-जोष भरला, तसाच पृथ्वीचे प्रेमगीत, काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्यांचे हात... अशी विलक्षण हळुवार, तरल कविता लिहून प्रेमाचा संदेश मराठी मनामनापर्यंत पोहोचवला. ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ ह्या कवितेतून त्यांनी अक्षरश: इतिहासही जिवंत केला. पुढे ‘स्वातंत्र्यदेवतेची विनवणी’ लिहून भारतमातेची व्यथा जनतेसमोर मांडली, लोकांच्या डोळ्यात अंजन घातले.
केशवसुत, मर्ढेकर, गोविंदाग्रज, सावरकर, रविकिरण मंडळातील कवी... आदी कवींचा प्रभाव कुसुमाग्रजांवर होता. तो प्रभाव, तो संस्कार घेऊन त्यांनी पुढे स्वत:ची एक काव्यधारा निर्माण केली. सामाजिक कविता, देशभक्तीपर कविता, प्रेम-विरहपर कविता, ऐतिहासिक प्रसंगांचे वर्णन करणार्या कविता, आध्यात्मिक आशायाच्या कविता, निसर्गकविता असे सर्व कविताप्रकार त्यांनी लीलया हाताळलेले दिसतात.
त्यांच्या ‘विशाखा’ ह्या काव्यसंग्रहावर मराठी रसिकांनी मनापासून प्रेम केले. ऐन स्वातंत्र्यलढ्यात (१९३० ते १९४०) या संग्रहातील कविता त्यांनी लिहिल्या होत्या. अक्षरश: पूर्ण काव्यसंग्रह पाठ असणारे अनेक रसिक आजही सापडतील, अशी त्यांच्या विलक्षण प्रतिभेची आणि लोकप्रियतेची किमया आहे. घाटबंद-रेखीव-प्रमाणबद्ध रचना, कल्पनावैभव, उत्कटता, चिंतनशीलता, राष्ट्रीयता, समाजाभिमुखता ही त्यांच्या सर्वच प्रकारच्या लेखनाची वैशिष्ट्ये होत. त्यांच्या या लेखनसेवेचा यथोचित गौरव ज्ञानपीठ पुरस्कार (१९८७-८८) देऊन करण्यात आला. हा साहित्य क्षेत्रातील देशातील सर्वोच्च पुरस्कार मिळवणारे ते दुसरे मराठी साहित्यिक होत.
इतरही अनेक मानाचे पुरस्कार त्यांना लाभले. ‘तात्यासाहेब’म्हणून महाराष्ट्राला सुपरिचित असणार्या कुसुमाग्रजांनी मुंबई येथे योजलेल्या पहिल्या जागतिक मराठी परिषदेचे (१९८९) अध्यक्षपद भूषवले. त्या आधी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे (१९६४,गोवा) आणि नाट्य संमेलनाचे(१९७०,कोल्हापूर) अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते. सन २००३मध्ये तत्कालीन केंद्र सरकारने कुसुमाग्रजांच्या स्मृत्यर्थ टपाल तिकिटाचे अनावरण केले. असा बहुमान मिळवणारे ते पहिलेच मराठी साहित्यिक होत. जागतिक मराठी परिषदेच्या वतीने तसेच मराठीवर प्रेम करणार्या अनेक संस्था-संघटनांच्या वतीने २७ फेब्रुवारी हा त्यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा दिवस’ म्हणून साजरा केला जातो.
कुसुमाग्रजांच्या रूपाने मराठी साहित्याचा आणि संस्कृतीचा मानदंड महाराष्ट्राला लाभला असे मानले जाते ते उचितच आहे.
शांता शेळके
शांता शेळके
ज्यांचं साहित्यही व्यक्तिमत्त्वाप्रमाणेच स्वच्छ, निर्मळ, नितळ, प्रसन्न, स्निग्ध, आनंददायी व शालीन आहे अशा ज्येष्ठ साहित्यिक!
मराठी साहित्यातील रसिकप्रिय कवयित्री ! गीतकार, कथालेखिका, कादंबरीकार, अनुवादक, ललितलेखिका, बालवाङ्मयकार, समीक्षा-स्तंभ लेखिका, वृत्तपत्र सहसंपादिका अशा वेगवेगळ्या साहित्यिक भूमिकांवरही हुकूमत असणार्या बहुश्रुत साहित्यिक म्हणजे शांता जनार्दन शेळके होत.
यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील इंदापूर या गावचा. बालपण याच जिल्ह्यातील खेड, मंचर या परिसरात गेले. शालेय शिक्षण पुण्याच्या हुजूरपागा शाळेत झाले. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षणही पुण्यात (स. प. महाविद्यालयात) झाले. कोष्टी समाजातील पहिली एम. ए. महिला अशीही त्यांची वेगळी ओळख. श्री. म. माटे, रा. श्री. जोग, प्र. के. अत्रे यांच्यासारख्या दिग्गजांमुळे साहित्याचे सखोल संस्कार त्यांच्या मनावर झाले. अत्रे यांच्या साप्ताहिक नवयुग व दैनिक मराठामध्ये त्यांनी काही काळ काम केले. मुंबईच्या रुईया, महर्षी दयानंद महाविद्यालयांमध्ये मराठीचे अध्यापनही केले.
मराठी साहित्यामधे त्यांनी विपुल लेखन केले आहे. सुमारे १०० पुस्तकांची निर्मिती त्यांनी केली. वेगवेगळे वाङ्मयप्रकार हाताळले, तरीही त्या त्यांच्या कविता व गीतांमुळेच जनमानसात घर करून आहेत. नवकवींच्या कवितांविषयी आत्मीयता बाळगणार्या रसिक श्रोत्या व मार्गदर्शक म्हणूनही त्यांचे मराठी साहित्यात एक वेगळे स्थान आहे. उत्कृष्ट वक्तृत्व हा आणखी एक गुणविशेष त्यांच्या अंगी होता. आळंदी येथील साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष म्हणून केलेल्या ओघवत्या शैलीतील, रसाळ भाषणाचा आनंद संपूर्ण महाराष्ट्रातील रसिकांनी घेतला.
मोठा गोल चेहरा, भव्य भालप्रदेशावर ठळक कुंकू, चष्मा, डोक्यावरून पदर, बोलण्यात अदब, स्निग्धता आणि मार्दव. या अशा व्यक्तिमत्त्वातून त्यांच्यातला खानदानीपणा दिसून येई. त्यांचा व्यासंग, बुद्धिमत्ता व अफाट स्मरणशक्ती यांमुळे रसिक श्रोते त्यांच्या वक्तव्यात गुंगून जात. जुन्या काळच्या संतकवींपासून ते आधुनिक कवींपर्यंत आवडलेल्या सर्व कविता त्यांना तोंडपाठ असत. अभिजात पौर्वात्य व पाश्र्चिमात्य साहित्याची बहुश्रुतता, भाषेतील सहजलालित्य आणि आत्माविष्काराची उर्मी यांमुळे त्यांचे लेखन वाचकांच्या मनाची पकड घेणारे ठरले. भोवतीच्या सामाजिक, सांस्कृतिक, वाङ्मयीन स्थित्यंतराचे अंतर्गत पडसाद त्यांच्या लेखनातून परावर्तीत होत राहिले, तसेच त्यांची मूळची सौंदर्यवादी वृत्तीही तशीच टिकून राहिली.
ग. दि. माडगूळकरांप्रमाणेच उत्कृष्ट व भावानुकूल भावगीते व चित्रपटगीते त्यांनी लिहिली. सुमारे तीनशेहून अधिक चित्रपटांसाठी त्यांनी गीतकार म्हणून भूमिका निभावली. तोच चंद्रमा नभात, मी डोलकर डोलकर, जीवलगा राहिले रे दूर घर, गणराज रंगी, मागे उभा मंगेश, रेशमांच्या रेघांनी, ही वाट दूर जाते, वादळ वारं सुटलं ग ... अशा कितीतरी अविस्मरणीय गीतांनी मराठी मनाला त्यांनी गुंगवून ठेवले. वर्षा (१९४७) हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह होय. त्यानंतर रूपसी (१९५६), गोंदण(१९७५), अनोळख (१९८६), जन्मजान्हवी (१९९०), तोच चंद्रमा (१९७६), कळ्यांचे दिवस फुलांच्या राती (१९८६), इत्यर्थ असे त्यांचे काव्यसंग्रह प्रकाशित झाले. कथा, ललित लेखसंग्रह, कादंबर्या यांबरोबरच जपानी कवींच्या हायकूंचे भावांतर (पाण्यावरच्या पाकळ्या), कालिदासाच्या मेघदूताचा अनुवाद अशी साहित्यनिर्मिती त्यांनी केली. शांता शेळके यांची संपादन क्षेत्रातील कामगिरीही मोठी आहे. गदिमांच्या गीतांचे संकलन, कुसुमाग्रजांच्या कथांचे व कवितांचे संपादन, पु. ल. देशपांडे यांच्या विविध भाषणांचे ‘रसिक हो!’ व ‘श्रोते हो!’ या ग्रंथांच्या माध्यमातून संपादन आणि विविध साहित्यकृतींसाठी प्रस्तावना लेखन - हे शांताबाईंचे कार्य म्हणजे मराठी साहित्यातील अनमोल योगदान आहे.
१९९६ मध्ये आळंदी येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या. चिमणचारा, गोंदण या त्यांच्या पुस्तकांना शासकीय पुरस्कार लाभला. काव्यलेखनासाठी ‘ग.दि.मा. गीतलेखन पुरस्कार’ ही त्यांना प्राप्त झाला.
मराठी सारस्वताची अखंड सेवा करत असतानाच त्यांची प्राणज्योत (२००२) मालवली. त्या वेळी ‘असेन मी नसेन मी... ’ ही त्यांचीच कविता उभ्या महाराष्ट्राला चटका लावणारी ठरली.
आशा भोसले
आशा भोसले
गेली सुमारे ६० वर्षे रसिकांना असीम आनंद देणार्या शतपैलू, चिरतरुण गायिका!
सुरांच्या साहाय्याने केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील व जगभरातील लोकमनावर अधिराज्य गाजवणारा एक आवाज. त्या गळ्याला गाता येत नाही असं कुठलंच गाणं नाही; तो आवाज चैतन्य निर्माण करू शकत नाही अशी कुठलीच मैफिल नाही, त्या गळ्याला त्याज्य आहे असा कुठलाच संगीत-प्रकार नाही. असा अद्वितीय आवाज म्हणजेच अर्थात आशाताई भोसलेंचा आवाज. महाराष्ट्राला लाभलेलं हे सुरांचं देणं. जुन्यांसाठी तितकंच जुनं, मुरलेलं आणि नव्यांसाठीही तितकंच नवं, ताजं.
मंगेशकर कुटुंबातला त्यांचा जन्म, मा. दीनानाथांचा मिळालेला वारसा, लता मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर आदी भावंडांचं मार्गदर्शन व त्यांची साथ-या सगळ्यांतून आशाताईंचा गळा घडत गेला. आशाताईंनी चित्रपट गायनाची सुरुवात ‘माझा बाळ’ या चित्रपटातून केली. १९५० च्या सुमारास त्यांनी हिंदी चित्रपटांतही अनेक गाणी गायली खरी, पण ते चित्रपट विशेष गाजले नाहीत. त्या काळात हिंदी चित्रपटसंगीतावर लतादीदी, शमशाद बेगम, गीता दत्त अशा बड्या गायिका राज्य करत होत्या. त्यामुळे आशाताईंना संधी मिळणं अवघड होतं. या गायिकांच्या राज्यात राहून, गाऊन, आपलं वेगळं अस्तित्व निर्माण करण्याचं, स्वत:ला सिद्ध करण्याचं फार मोठं आव्हान आशाताईंपुढं होतं. या दरम्यान त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अडचणी, मुलांची जबाबदारी, प्रतिकूल परिस्थिती या सगळ्या विपरीत घटकांचा सामना करत करत आशाताईंनी ते आव्हान स्वीकारलं. त्यांनी ते स्वबळावर, आत्मविश्वासानं, यशस्वीपणे पेलूनही दाखवलं.
१९५७-५८ हे वर्ष आशाताईंचं होतं. सचिन देव (एस.डी.)बर्मन यांच्याकडे गाण्याची संधी त्यांना मिळाली. त्या संधीचं त्यांनी सोनं केलं. कालाबाजार, लाजवंती, नौ दो ग्यारह, चलती का नाम गाडी, सुजाता हे आणि असे असं‘य चित्रपट त्यांनी आपल्या आवाजाने अजरामर केले. पुढची पाच दशकं आशाताईंनी गाजवली. अनेक संगीतकारांबरोबर काम केलं. अनेक कवींच्या काव्यरचनांना सुरांचं कोंदण दिलं. एवढंच नाही तर आपल्या गाण्यांबरोबर त्या चित्रपटांना, त्यातल्या अभिनेत्रींनादेखील अजरामर केलं.
ओ. पी. नय्यर आणि आशाताई एक अफलातून जोडी होती. १९६० च्या सुमारास नय्यर यांचं संगीत असणारं ‘ऑखोसे जो उतरी है दिलमे’ (फिर वही दिल लाया हूँ ) हे गाणं; १९६५ चं ‘जाईंये आप कहां’ (मेरे सनम); १९६८ मधलं ‘वो हसीन दर्द देदो’ (हम साया); चैन से हमको कभी -अशी मदहोश करणारी गाणी रसिकांच्या हृदयावर राज्य करायला लागली.
आर. डी. बर्मन यांच्याबरोबर काम करताना ‘पिया तू अब तो आजा’ हे १९७१ चे कारवॉं चित्रपटातील गीत, १९७१ चेच फिल्मफेअर पुरस्कार विजेते ‘दम मारो दम’; ‘जाने जा’ हे १९७२ चे जवानी दिवानीतले गाणे -ही गाणी आशाताईंच्या आवाजाचा नवा बाज दाखवून गेली. १९८१ चा ‘उमराव जान’ हा चित्रपट आशाताईंमधली गझल गायिका रसिकांसमोर घेऊन आला. आशाताईंचा आवाज, खय्याम यांचे संगीत आणि दिल चीज क्या है, इन आँखोंकी मस्तीसारखी शब्दरचना हे सगळंच जमून आलं. ‘दिल चीज क्या है’ या गीताला १९८१ चा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. पुढे ‘इजाजत’ चित्रपटातल्या ‘मेरा कुछ सामान’ या त्यांच्या गाण्यालाही १९८६ चा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
हिंदीबरोबर आशाताईंची मराठी गाण्यांची कारकीर्द बहरतच होती. सुधीर फडके, हेमंत कुमार, लता मंगेशकर, सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल अशा गायक-गायिकांबरोबरची गाणी मराठी रसिकमनात घर करून राहिली आहेत. बा. भ. बोरकर, आरती प्रभू, ग. दि. माडगुळकर, शांता शेळके, सुरेश भट, सुधीर मोेघे यांच्या कवितांबरोबर सौमित्रसारख्या नव्या दमाच्या कवींच्या कविताही आशाताईंच्याच आवाजात रसिकांपुढे आल्या. सर्व कवींच्या शब्दांना आशाताईंनी सुरेल न्याय दिला. तरुण आहे रात्र अजूनी, जिवलगा राहिले रे दूर, ही वाट दूर जाते, फुलले रे क्षण माझे, झिनी झिनी वाजे, गेले द्यायचे राहूनी, गंध फुलांचा गेला सांगून, आज कुणीतरी यावे, एका तळ्यात होती - अशा लोकप्रिय गीतांची यादी प्रचंड आहे. ‘रेशमाच्या रेघांनी’तला लावणीचा ठसका, ‘सैनिक हो तुमच्यासाठी’तला कृतज्ञता भाव, ‘केव्हा तरी पहाटे’तली हुरहुर, ‘जे वेड मजला लागले’ची गोडी सगळंच विलक्षण!
त्यांनी ज्यांच्यासाठी गाणी गायली ते संगीतकार; ते गीतकार; त्या अभिनेत्री आणि आशाताईंचा आवाज- या सर्वांच्या परस्परसंबंधांचे सं‘यात्मक व गुणात्मकदृष्ट्या वर्णन करणे हे एक अशक्यप्राय काम आहे. त्याचबरोबर आशाताईंनी गायलेली चित्रपटगीते (मराठी, हिंदी व अन्य भाषांतील), भावगीते, गझल, भजने-भक्तिगीते इत्यादी गाण्यांची व संबंधित चित्रपटांची केवळ यादी करायची ठरवली, तरी ते एक आव्हानात्मक काम आहे.
हिंदी चित्रपट गीतांचा विचार करता आशाताईंनी एस.डी.बर्मन यांच्यापासून ते ए.आर. रहमानपर्यंतच्या विविध कालखंडांतील, अनेक प्रकारच्या संगीतकारांबरोबर काम केले आहे. मराठीतही दत्ता डावजेकर-श्रीनिवास खळे यांच्यापासून ते श्रीधर फडके यांच्यापर्यंत असंख्य संगीतकारांच्या रचनांना त्यांनी सुरेल साज चढवला आहे. मधुबाला-मीनाकुमारीपासून ते अलीकडच्या तब्बू-उर्मिला मातोंडकर-ऐश्र्वर्या रायपर्यंतच्या अभिनेत्रींना त्यांनी आपला आवाज दिला आहे. त्यांनी महंमद रफी, किशोर कुमार व सुधीर फडके यांच्याबरोबरचा काळ तर गाजवला आहेच, तसेच त्या आज ऋषिकेश रानडे सारख्या तरुण गायकाबरोबरही गात आहेत. आशाताई आजपर्यंत सुमारे ९०० चित्रपटांशी गायिका म्हणून जोडल्या गेल्या आहेत. तसेच त्यांनी आत्तापर्यंत १४ भाषांमध्ये सुमारे १२००० गाणी गायली आहेत.
नाच रे मोरा-आईए मेहेरबॉं-दिव्य स्वातंत्र्य रवी (नाट्यगीत)-तनहा तनहा यहां पे जीना-जिवलगा राहिले रे दूर घर माझे-रंग दे मुझे रंग दे- सांज ये गाकुळी-जानम समझा करो-मागे उभा मंगेश... ही ‘रेंज’च अफाट आहे, हा आवाकाच अविश्र्वसनीय आहे. उपशास्त्रीय संगीत, मराठी भावगीतं, मराठी-हिंदी चित्रपट गीतं, नाट्यगीतं, गझल, लावणी, डिस्को-रॉक-पॉप गाणी, अन्य भाषांतील गाणी - अशा सर्वच प्रकारच्या संगीतामध्ये आशाताई आजही तेवढ्याच ताकदीने गाऊ शकतात. हे शतपैलुत्व अलौकिक आहे, एकमेवाद्वितीय आहे.
कॅनडा, इंग्लंड, अमेरिका, दुबई, स्वीडन आदी अनेक देशांत झालेले कार्यक्रम, परकीय संगीतकारांबरोबर केलेलं काम, ‘राहुल अँड आय’ सारखा अल्बम, लेस्ली लुईसबरोबरचं काम असे अनेक नवनवे प्रयोग आशाताई आजही करतात. काही महिन्यांपूर्वी, वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ब्रेट ली, अभिनेता संजय दत्त यांच्याबरोबर गाण्याचा प्रयोग केला. ‘आशा अँड फ्रेंड्स’ या अल्बमचा हा प्रयोग कमालीचा यशस्वी ठरला आहे. अभिजात संगीत कलेला जसं स्थळ-काळ-वेळाचं बंधन नाही, तसेच आशाताईंच्या आवाजालाही या कशाचंच बंधन नाही.
राष्ट्रीय पुरस्कार, असंख्य फिल्मफेअर पुरस्कार, मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार, महाराष्ट्र सरकारचे १५ पेक्षा जास्त पुरस्कार आणि नुकताच २००८ मध्ये मिळालेला पद्मविभूषण पुरस्कार- हे पुरस्कार आशाताईंना बहाल करण्यात आले आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे चित्रपट क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार ‘दादासाहेब फाळके सन्मान’ आशाताईंना २०००-२००१ मध्ये प्रदान करण्यात आला. भारत-पाकिस्तान असोसिएशनचा ‘नाईटिंगेल ऑफ एशिया’ हा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे. तसेच ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान टोनी ब्लेअर यांच्या हस्ते, बी.बी.सी.आकाशवाणीच्या वतीने जीवनगौरव पुरस्कारही त्यांना देण्यात आला.
आशाताई मंचावरून एक ‘उत्कृष्ट परफॉर्मर’ म्हणून रसिकांसमोर येतातच, पण त्या स्वयंपाकाची आवड असलेल्या, मुलांना सांभाळणार्या एक परिपूर्ण गृहिणी आहेत; क्रिकेटच्या दर्दी रसिक असलेल्या भारतीय नागरिक आहेत. एवढे यश, मानसन्मान मिळूनही पाय घट्टपणे जमिनीवरच असलेल्या, साधी राहणी असलेल्या स्त्री-कलाकार आहेत. इतर मंगेशकर भावंडांप्रमाणेच त्यांना वडिलांचा (दीनानाथांचा) अभिमान आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे जुना काळ, प्रचंड कष्ट, धडपड, जुने सहकारी (सहगायक, संगीतकार, गीतकार, सहवादक, स्टुडिओतील कर्मचारी ... इत्यादी) या गोष्टी न विसरणार्या ,किंबहुना आवर्जून लक्षात ठेवणार्या आशाताई ह्या एक ‘संवेदनशील माणूस’ आहेत. म्हणूनच आजच्या स्पर्धेच्या युगात एखाद्या दूरदर्शन वाहिनीवरील स्पर्धेत (रअँलिटी शोमध्ये)‘महागुरू’ची भूमिका निभावताना त्यांना अवघडल्यासारखं वाटतं. एखाद्या स्पर्धकाला स्पर्धेबाहेर काढण्याचा निकाल देताना आजही त्यांचे डोळे पाणावतात.
विजय तेंडुलकर
विजय तेंडुलकर
शतकातून एखादाच होणारा असा बंडखोर, निर्भीड, द्रष्टा व सिद्धहस्त नाटककार!
विजय तेंडुलकर हे मराठी नाव असलं तरी या नावानं मराठीपणाच्या सीमा केव्हाच ओलांडल्या आहेत. सामान्य माणसाच्या नि:शब्दतेला आवाज देणारा माणूस अशी बिरुदावली मिरवणार्या तेंडुलकरांनी भारतीय रंगभूमीच्या इतिहासातच नाही तर जागतिक रंगभूमीच्या इतिहासात स्वत:चं स्थान ठळक केलं. फार कमी भारतीय लेखकांना ही गोष्ट साध्य झाली आहे. त्यांची रंगभूमीवरची धगधगती कारकीर्द पाहिली की, खरंच प्रश्र्न पडतो, की तेंडुलकरांनी कशाच्या बळावर एवढा विस्मयकारी प्रवास केला असावा?
विजय धोंडोपंत तेंडुलकर असं साधं, सरळ नाव धारण करणार्या या माणसाकडं ना लौकिक शिक्षणाची शिदोरी होती, ना लेखनाचा कौटुंबिक वारसा! पण हा माणूस जीवनाच्या शाळेत मात्र भरपूर शिकला आणि जे शिकलं, जे अनुभवलं ते लेखनात उतरवत गेला. त्यामुळेच तेंडुलकर नाटकाला वास्तव पातळीवर आणून, मानवी जीवनातील विविध स्तर लेखनातून उलगडून दाखवू शकले.
जीवनाच्या शाळेत शिकत असतानाच तेंडुलकरांना त्यांचे अभ्यासविषय मिळत गेले. त्यातही माणसाचं जगणं हा त्यांचा अधिक जिव्हाळ्याचा विषय. विषयाच्या या वेगळेपणानंच त्यांना वैश्विक पातळीवर नेऊन ठेवलं. त्यांच्या मते लेखन हे जगण्यातून येतं. त्यामुळे जगणं महत्त्वाचं!
त्यांचं लिखाण कधी एखाद्या परंपरागत पठडीत अडकलं नाही. त्यांनी आपल्या लेखनातून कधी एखादा सामाजिक प्रश्र्न हातळला नाही की, कधी एखाद्या घडून गेलेल्या घटनेचा तपशील दिला नाही. त्यांच्या लेखनाचा मध्यबिंदू होता मानवी स्वभाव आणि मानवी जीवन! मानवी स्वभावाचे आयाम त्यांच्या ‘गिधाडे’ आणि ‘सखाराम बाईंडर’ मध्ये हिंसेचं रूप घेऊन येतात, तर ‘घाशीराम कोतवाल’ मध्ये प्रच्छन्न लैंगिकतेचं रूप घेऊन येतात. खोट्या साधनशूचितेला लक्ष्य करणार्या ‘शांतता! कोर्ट चालू आहे’ मध्ये तेंडुलकर समाजमनाचा एक वेगळाच पैलू आपल्यासमोर मांडतात.
मराठी नाटकांना नवतारुण्य प्रदान करणारा नाटककार म्हणून तेंडुलकरांना गौरवले जाते. त्यांचे कथाविषय धाडसी होते आणि ते त्यांनी तितक्याच निर्भिडपणे समाजासमोर मांडले. त्या अर्थाने ते काळाच्या खूप पुढे होते. चाळीस वर्षांपूर्वी त्यांनी हाताळलेले विषय आजच्या परिस्थितीलाही तंतोतंत लागू पडतात, आणि हीच गोष्ट त्यांचे द्रष्टेपण सिद्ध करते. १९५५ च्या सुमारास संगीत नाटकांच्या साखर झोपेत असणारी प्रेक्षकमंडळी तेंडुलकरांच्या नाटकांनी हादरली. त्या वेळच्या रसिक प्रेक्षकांनीच नाही, तर समीक्षकांनीही तेंडुलकरांवर भरपूर तोंडसुख घेतले. त्यांच्या याच नाटकांमुळे नंतरच्या काळात आंतरराष्ट्रीय कीर्तीचे धनी झालेल्या तेंडुलकरांना त्यांच्या कारकीर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यात मात्र विखारी टीकेला सामोरे जावे लागले. समाजाकडून झालेल्या या अवहेलनेवर तेंडुलकरांची प्रतिक्रिया बोलकी आणि त्यांच्या लेखनाचा हेतूच स्पष्ट करणारी होती. ते म्हणतात की, माझी लेखनाची गरज मला माझ्यासारखं लिहू द्यावं एवढीच होती. ‘लिहिणं’ ही माझी गरज होती. त्यामागे कुणाचं बरं-वाईट करावं, कशाला वळण द्यावं असला काहीही हेतू नव्हता.
काय खपणार आहे, याचा विचार तेंडुलकरांनी लिहिताना कधीच केला नाही. यापेक्षा सध्या समाजमनाला कोणत्या विचारांची गरज आहे आणि त्यादृष्टीने मानवी सहवेदना कशा प्रकारे सादर करायची आहे, याचे तारतम्य त्यांनी कायमच राखले. म्हणूनच भारतीय रंगभूमीच्या इतिहासातील ते एक सर्वोत्कृष्ट नाटककार ठरले. तेंडुलकरांनी आपल्या वैचारिक बंडखोरीने नाटकातील निव्वळ आशायाच्याच चौकटी मोडल्या नाहीत तर पटकथा, संवाद, नेपथ्य यांनाही ‘नवी भाषा’ दिली.
तेंडुलकरांच्या नाटकाची भाषा हा तर एक स्वतंत्र अभ्यासविषयच आहे. अत्यंत साध्या आणि नेटक्या भाषेतून त्यांचा कथाविषय उलगडत जातो. ही भाषा ऐकायला आणि वाचायला सोपी वाटली, तरी विलक्षण गुंतागुंतीच्या भावना व्यक्त करते. त्यांचे नेमके शब्द अपेक्षित परिणाम साधतात. शब्दरचना एवढी नेमकी व परिपूर्ण की, एकही शब्द अधिक-उणा करता येणार नाही. त्यांच्या भाषेला एक लय आहे, पण म्हणून ती पद्यात्मक नाही, उलट प्रसंगी अतिशय गद्य आणि वास्तव आहे. त्यांच्या चित्रपटाच्या पटकथा आणि नाटकं पाहण्याइतकीच वाचनीयही आहेत. ती वाचताना त्यांची या माध्यमावरची पकड आपल्याला अवाक करते. त्यांच्या नाटकांना दिग्दर्शकाची गरजच भासणार नाही अशी त्यांची रचना असे. काय करायचे आहे याचा सर्व तपशील कंसांत दिलेला. कंसात दिलेल्या या सूचना नटाला मार्गदर्शन तर करतातच, पण त्या कथेचा अविभाज्य भाग असतात आणि कथेचा ओघ पुढे नेण्यास साहाय्य करतात. थोडक्यात, तेंडुलकरांनी नाटक सादर करण्याची, लिहिण्याची आणि चित्रपट कथांचीही भूमिती बदलून टाकली.
तेंडुलकरांची बाह्य प्रतिमा जितकी शांत आणि मितभाषी होती, तितकीच त्यांची नाटके दाहक आणि वास्तव होती. ‘हिंसा’ त्यांच्या चिंतनाचा विषय होता. हिंसा माणसामध्ये उपजतच असते असं त्यांचं मत होतं. त्यांच्या सर्वच नाटकांतून आपल्याला हिंसेचे विविध आविष्कार पाहायला मिळतात.
तेंडुलकरांनी आपल्या लिखाणातून मानवी मनाच्या कुरुपतेचं वर्णन केलं असलं, तरी प्रत्यक्ष जीवनात ते कमालीचे सकारात्मक होते. याचं स्पष्टीकरण देताना ते एके ठिकाणी म्हणतात की, स्वत:चं आयुष्य जगताना आणि दुसर्यांचं अनुभवताना जे बोलायचं होतं, सांगायचं होतं, ते लेखनातून व्यक्त होत गेलं. गरजेतून जशा वाटा सापडतात, तशीच ही लेखनाची वाट मला अनाहूतपणे मिळाली.
आपल्या लिखाणातून समाजमनाचा वेध घेणार्या या लेखकाचा पिंडही सामाजिकतेचा होता. त्यांच्या मनाचा ओढा चळवळींकडे होता. नर्मदा बचाव आंदोलन, ग्रंथालीसार‘या सांस्कृतिक चळवळी, विचार स्वातंत्र्य मानणार्या चळवळी, रंगभूमीवरचे वेगवेगळे प्रयोग यात त्यांनी कायमच सक्रिय पुढाकार घेतला. काही काळ ते सेवादलाचे कार्यकर्तेही होते. त्यांच्या विचारातील ही कृतिशील सामाजिकता व व्यापकताच त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मंचावर नेऊन ठेवत असे.
तेंडुलकरांनी मराठी नाटकांना आंतरराष्ट्रीय स्तरावर नेलं हे तर खरंच, पण ते केवळ नाटककार नव्हते तर उत्कृष्ट दर्जाचे समीक्षक आणि दर्दी रसिकही होते. ते सौंदर्यवादी होते आणि आयुष्यभर लहान-सहान गोष्टीतले सौंदर्य टिपतच जगले. अभिजात कलागुणांचे ते चाहते होतेच, पण विशेष म्हणजे नवविचारांचे आणि आयुष्यातील सर्व प्रकारच्या नवतेचे चाहते होते. अशा विचारांचे, साहित्याचे, कलेचे आणि ती निर्माण करणार्या कलाकारांचे त्यांनी कायम स्वागतच केले.
जानेवारी, १९२८ मध्ये कोल्हापूर येथे जन्मलेल्या तेंडुलकरांचं शिक्षण दहावीपर्यंतच झालं. पण शाळेचं आणि महाविद्यालयाचं शिक्षण नसतानाही माणूस काय पराक्रम करू शकतो, हे त्यांनी आपल्या उदाहरणातून दाखवून दिलं. १९४८ साली त्यांची पहिली कथा प्रकाशित झाली. पण त्यांच्या लेखनाला खरा बहर आला १९५५ नंतर. कारकीर्दीच्या सुरुवातीला काही काळ त्यांनी पत्रकारिता केली. सुरुवातीचा काही काळ लोकसत्तामध्ये सहसंपादक म्हणून काम केलं, तर पुढे काही काळ मराठा, नवयुग साप्ताहिक, वसुधा मासिक इथेही नोकरी केली. १९७८-८१ च्या दरम्यान त्यांनी टाटा समाज विज्ञान संस्थेत अध्यापनाचेही काम केले.
आज जगात असा एकही रंगमंच नसेल जिथं तेंडुलकरांची नाटकं झालेली नाहीत. त्यांच्या नाटकांचे आंतरराष्ट्रीय महोत्सव आयोजित केले जातात आणि भले-भले नट त्यातून काम करण्यात धन्यता मानतात. हे सर्व पाहिल्यावर वाटतं की, तेंडुलकर मराठी होते हे आपलं भाग्य म्हणावं लागेल.
तेंडुलकरांना मिळालेले मान-सन्मान -
- १९८४ - पद्मभूषण.
- १९७१ - संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार.
- १९९१ - कालिदास पुरस्कार, महाराष्ट्र गौरव पुरस्कार.
- कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा पहिला जनस्थान पुरस्कार.
- `अर्धसत्य' - पटकथा लेखनाबद्दल फिल्मफेअर पुरस्कार.
- `आक्रोश' - पटकथा आणि संवादाबद्दल फिल्मफेअर पुरस्कार.
- ‘देशातील वाढता हिंसाचार’ यावर अभ्यास करण्यासाठी नेहरू शिष्यवृत्ती प्रदान.
पु.ल.देशपांडे
पु.ल.देशपांडे
साहित्य, संगीत, नाटक, चित्रपट, वक्तृत्व आदी क्षेत्रांत ज्यांना अभिव्यक्तीची ‘अमृतसिद्धी’ साध्य झाली होती आणि ज्यांची ‘साठवण’ मराठीजनांनी अनंत काळासाठी मनामनात करून ठेवली आहे असे ‘आनंदयात्री’!
महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी मनाजवळचं व्यक्तिमत्त्व म्हणजे पु. ल. देशपांडे. सर्वसामान्य मराठी माणसाचं प्रेम, आपुलकी, आदर, त्यांच्याबद्दलचा अभिमान... आदी भावनांचं सर्वाधिक प्रकटीकरण ज्यांच्याबाबत महाराष्ट्रानं अनुभवलं ते व्यक्तिमत्त्व म्हणजे पुरूषोत्तम लक्ष्मण देशपांडे! त्यांच्याबद्दल लिहायला शब्द अपुरे पडतील. केवळ लेखक नव्हे तर बहुआयामी असणारं असं व्यक्तिमत्त्व. लेखनातही तोचतोचपणा नाही. निबंध, समीक्षण, नाटक, प्रहसन, एकांकिका, अनुवाद, पटकथा, व्यक्तिचित्रण, चिंतनात्मक लेखन अशा अनेक लेखनप्रकारात त्यांच्या लेखणीने हुकूमत गाजवली. गांधीजींचं चरित्रलेखन, बंगाली भाषेचा अभ्यास, रवींद्रनाथांच्या कवितांचा अनुवाद याही वेगळ्या प्रकारच्या लेखनातून पु. ल. आपल्याला भेटतात. साहित्य, संगीत, नाटक, वक्तृत्व, अभिनय.... कलेच्या ज्या ज्या प्रांतात पु.ल. वावरले त्या त्या प्रांताचे ते अनभिषिक्त सम्राट झाले. अभिनय, एकपात्री अभिनय, हार्मोनियम (संवादिनी) वादन, कथाकथन, स्वत:च्या लेखनाचे सादरीकरण, अभिवाचन, नाट्य व पटकथा लेखन, दिग्दर्शन, काव्यवाचन... या प्रत्येक क्षेत्रात पुलंनी अतिशय उच्च दर्जाचे यश प्राप्त केले, अफाट लोकप्रियता मिळवली, आपला श्रेष्ठ दर्जा सिद्ध केला.
वयाच्या १६ व्या वर्षी ‘आजोबा हरले’ या प्रहसनापासून पु. लं ची लेखनयात्रा चालू झाली. पुढे पूर्वरंग, अपूर्वाईतून त्यांनी प्रवास घडवला, कधी व्यक्ती आणि वल्लीतून अनेकांची भेट घालून दिली, कधी मर्ढेकर-आरती प्रभू-बोरकरांच्या कविता प्रभावी काव्यवाचनातून रसिकांपर्यंत समर्थपणे पोहोचवल्या, बटाट्याच्या चाळीचा फेंरफटका घडवला. असे हे ‘कोट्याधीश’ पु.ल. रसिकांच्या मनात घर करून राहिले.
पु. ल. नी एकूण १४ एकांकिका लिहिल्या. ती फुलराणी, तुज आहे तुजपाशी, सुंदर मी होणार अशी उत्तमोत्तम नाटकं लिहिली. नाट्यदिग्दर्शन, अभिनय या क्षेत्रांतही आपला ठसा उमटवला. ‘अंमलदार’ हे पु. लं. नी रूपांतरित केलेलं पहिलं नाटक. अनुवाद किंवा रूपांतर हा पु. लं. च्या विविध पैलूंमधला आणखी एक पैलू. इतर भाषिक नाटकांचं रूपांतर करताना त्याचं भारतीयीकरण, मराठीकरण मोठ्या कौशल्यानं पु. लं. नी केलं. १९४७ साली ‘कुबेर’ या चित्रपटातून पु. लं. चं पहिलं दर्शन झालं. संवादलेखक, दिग्दर्शक, पटकथाकार, गायक, नायक, गीतकार, संगीतकार अशा अनेक भूमिकांमधून चित्रपटक्षेत्रात पु. लं. वावरले. त्यांचा गुळाचा गणपती हा चित्रपट ‘सबकुछ पु.ल.’ म्हणूनच गाजला. ही त्यांची कारकीर्द १९९३ च्या ‘एक होता विदूषक’ इथवर बहरली. त्यातले त्यांचे संवाद प्रत्येकाला भावले, अभिजाततेचा अनुभव देऊन गेले.
भास्कर संगीतालयाच्या दत्तोपंत राज्योपाध्यांकडून घेतलेलं हार्मोनियमचं शास्त्रीय शिक्षण हा पु. लं. चा आणखी एक पैलू. पंडित भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे, मिल्लिकार्जुन मन्सूर अशा दिग्गजांना त्यांनी हार्मोनियमवर समर्थ साथ केली. त्यांच्या हार्मोनियम वादनाच्या ध्वनिफितीही उपलब्ध आहेत.
सादरीकरणाचं विलक्षण व हमखास यशस्वी ठरणारं कर्तृत्व पु. लं. कडे होतं. त्यांचे हावभाव, शब्दफेक, देहबोली, आवाजावरचं नियंत्रण सगळंच विलक्षण आणि लक्ष वेधून घेणारं. बटाट्याची चाळ, वार्यावरची वरात, असा मी असा मी या प्रयोगांतून पु. लं. मधले ‘परफॉर्मर’ भेटतात. लेखन असो, वादन असो, गायन असो, नाटक किंवा वक्तृत्व सगळीकडे पु. लं. चं सादरीकरण थक्क करतं.
राजकारण हा पु. लं. चा प्रांत कधीच नव्हता. पण १९७५ च्या आणीबाणीच्या काळात त्यांच्या वक्तृत्वाला व विनोदाला उपहासाची धार आली. त्या काळात जयप्रकाश नारायणांच्या ‘प्रीझन डायरी’ चा त्यांनी मराठी अनुवाद करून लोकांपुढे साकार केला. आणीबाणीनंतरच्या निवडणुकीत जनता पक्षासाठी पु. लं. नी अनेक भाषणं केली. राजकारणात त्या काळापुरता पु. लं. मधला कार्यकर्ता आणीबाणीविरुद्ध लढला.
पु. लं. च्या साहित्यातून त्यांची अचाट निरीक्षणशक्ती, अनलंकृत प्रवाही संवादात्मक भाषाशैली, मराठी व संस्कृतवरील प्रभुत्व, संदर्भ श्रीमंती, भाषेतली लवचीकता, नावीन्य, भावस्पर्शी लिखाण आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे निखळ, निर्व्याज विनोद, कोणालाही न बोचणारा, दुखणारा विनोद या सगळ्या गोष्टी प्रामुख्यानं दिसतात. त्यांच्या लेखनासह, वक्तृत्वातही संदर्भांची श्रीमंती जाणवते. संस्कृत सुभाषिते, वेद-पुराणे, संतसाहित्य, म्हणी-वाक्प्रचार, यांसह विविध संस्कृतींमधले, जीवनव्यवहारातले अनेक संदर्भ पु. लं. च्या समृद्ध लेखनात आढळतात. यामुळेच त्यांची निवेदन-शैलीही उठून दिसते!
साहित्य-नाटक-संगीत या क्षेत्रात प्रवेश करणार्या नवोदिताला शाबासकीची थाप द्यावी ती पु.लं. नीच. ‘ती फुलराणी’ करताना भक्ती बर्वे-इनामदारांना हाच अनुभव आला. ज्येष्ठ गायिका आशा खाडिलकर यांचं गायन ऐकून ते आवडल्याचं कळवणारा फोन रात्री ११:०० वाजता करून प्रोत्साहन देणारे पु. ल. वेगळेच. तरुण संगीतकार सलील कुलकर्णींच्या बालगीतांच्या ध्वनिमुद्रिकेचं भरभरून कौतुक करणारे पु. ल. च होते. मुस्लीम समाजात काम करणार्या हमीद दलवाईंबद्दल पहिल्यांदा पु. लंनीच लिहिलं. एका अनोळखी दिग्गजाची ओळख सामान्य वाचकांना करून दिली. समोरच्या व्यक्तीमधल्या चांगल्या गोष्टी ओळखून त्या इतरांना सांगण्याची क्षमता फार कमी लोकांकडे असते आणि त्यापैकी एक पु. ल. होते.
पु.लं. मधला दाता खूप जणांना अनोळखी असेल. सामाजिक बांधिलकी कृतीशीलतेने मानणार्या पु. ल. व सुनीताबाई या दांपत्याने बाबा आमटे, अनिल अवचट, बाबा आढाव, हमीद दलवाई आदी अनेक कार्यकर्त्यांना, सामाजिक संस्थांना, त्यांच्या विविध उपक्रमांना कोणताही गाजावाजा न करता, सहजपणे व सढळतेने सहकार्य केले. सुनिताबाईंसारख्या सहधर्मचारिणीच्या प्रयत्नातून पु. ल. देशपांडे फाउंडेशन उभं राहिलं. या फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी पुढील संस्था - व्यक्तींना मदत केली.
- अंध व्यक्तींसाठी देणगी - उत्तमोत्तम मराठी साहित्य ब्रेल लिपीत आणण्यासाठी आर्थिक मदत.
- वेश्यांच्या मुलांसाठी चालवल्या जाणार्या निहार या संस्थेला सहकार्य.
- कोयना भूकंपग्रस्त मुलांसाठी मदत.
- ग्रामीण स्तरावरील शास्त्र प्रयोगशाळेलाही मदत.
- मुंबई येथील एशियाटिक सोसायटी या संस्थेला सहकार्य.
कलाक्षेत्रातील त्यांच्या अभूतपूर्व योगदानामुळे पु. ल. देशपांडे पहिल्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे मानकरी ठरले. पु. लं. ना पुण्यभूषण, पद्मश्री, पद्मभूषण या पुरस्कारांसह संगीत नाटक अकादमी पुरस्कार व साहित्य अकादमीचा पुरस्कारही प्राप्त झाला. मध्य प्रदेश, कलकत्ता, गोवा या राज्यांतूनही पु. लं. ना पुरस्कार मिळाले आणि हा मराठी साहित्यिक भौगोलिक, भाषिक व सांस्कृतिक सीमा ओलांडून पार गेला.
‘जिवंत माणसाइतके जगात पाहण्यासारखे काही नाही’, अशी जीवनाकडं बघण्याची त्यांची वृत्ती आपले आयुष्य आणखी सुंदर बनवते. जीवन सुंदर करू पाहणार्या चार्ली चॅप्लीन आणि रवींद्रनाथ टागोर या दोन व्यक्तिमत्त्वांचा प्रभाव पु. ल. देशपांडे यांच्या जीवनातून व अभिव्यक्तीतूनही स्पष्टपणे जाणवतो. त्यांना ‘महाराष्ट्राचे वुडहाऊस’ ही म्हटले जाते. अवघ्या महाराष्ट्रावर प्रदीर्घ काळ आनंदाची उधळण करणारा हा आनंदयात्री १२ जून, २००० ला जग सोडून गेला खरा, पण त्यांचं अस्तित्व आजही मराठी मनात शाबूत आहे.

शाहीर अण्णा भाऊ साठे
शाहीर अण्णा भाऊ साठे
शाहीर अण्णा भाऊ साठे म्हणजे जातिभेदांमुळे, जातींच्या उतरंडीमुळे शिक्षणापासून, समग्र विकासापासून वंचित राहिलेल्या मातंग समाजातील एक समृद्ध व्यक्तिमत्त्व. त्या काळातील कुरुंदवाड संस्थानातील वटेगावमध्ये १९२० साली त्यांचा जन्म झाला. आई आणि घरातील मोठे लोक दोर वळण्याच्या कामाला जात. त्यांचे वडील पोटापाण्यासाठीच मुंबईत राहत असत. त्यामुळे लहान भावंडांना सांभाळण्याची जबाबदारी तुकारामांवर (अण्णांचे मूळ नाव) म्हणजेच अण्णा भाऊंवर होती. त्यांच्या वडिलांनी उच्चभ्रू आणि उच्चशिक्षित समाज मुंबईत पाहिल्याने आपल्या मुलांनी शिकले पाहिजे अशी त्यांची इच्छा होती. त्यांच्या आग्रहामुळेच वयाच्या १४ व्या वर्षी अण्णांनी प्राथमिक शिक्षणाला सुरुवात केली. परंतु तत्कालीन मागास जातींतील मुलांसाठी त्या काळी वेगळ्या शाळा होत्या. त्या मुलांशी शिक्षकांचे वर्तनही निर्दयीपणाचे होते. वाढलेले वय, सदोष शिक्षण पद्धती यांमुळे अण्णा फार दिवस शाळेत गेलेच नाहीत.
लहानपणापासूनच त्यांना विविध छंद होते. मैदानी खेळ खेळण्याचा त्यांचा पिढीजात वारसा असल्याने दांडपट्टा चालविण्यात त्यांचा हात धरणारा कोणी नव्हते. याशिवाय जंगलात एकटे भटकणे, पोहणे, मासेमारी, शिकार करणे, विविध पक्षांशी मैत्री करणे, जंगलातील पानाफुलांमधील सूक्ष्म फरक शोधणे असे एक ना अनेक छंद त्यांना होते. या छंदांमध्ये निरागसपणे बागडण्यातच त्यांचे बालपण गेले. मोठे होत असताना त्यांच्या आवडींमध्ये वाढच होत होती. लोकगीते पाठ करून ती टिपेच्या आवाजात म्हणणे, पोवाडे, लावण्या पाठ करणे, इतरांना त्या आत्मीयतेने म्हणून दाखवणे या छंदांमुळे त्यांच्याभोवती नेहमीच मित्र मंडळी जमलेली असत. रेठर्याच्या जत्रेत त्यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांचे भाषण ऐकले. त्याचा परिणाम अण्णा भाऊंवर झाला आणि ते स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होऊ लागले.
चळवळीत सामील होऊन लोकनाट्यांत छोटी मोठी कामे त्यांनी केली. याच काळात दुष्काळ पडल्याने अण्णांच्या वडिलांनी आपल्या कुटुंबाला मुंबईत न्यायचे ठरविले. त्याच वेळी अण्णा भाऊंचे बालपण संपले. वयाच्या ११ व्या वर्षी अण्णा आपल्या आई-वडिलांबरोबर मुंबईत आले. हे कुटुंब भायखळ्याच्या चांदबीबी चाळीत राहायला गेले. त्या काळी मुंबईत स्वस्ताई असल्याने सुरुवातीचा काळ सुखाचा गेला. मुंबईत फिरताना दोन गोष्टींकडे ते आकर्षिले गेले, एक म्हणजे विविध राजकीय संघटना आणि दुसरे म्हणजे मूक चित्रपट.
विविध राजकीय संघटनांचे ध्येय ब्रिटिशांना हाकलून देणे हेच होते. परंतु प्रत्येकाची विचारसरणी वेगळी होती. यांपैकी कम्युनिस्ट विचारसरणीचे अण्णा अनुयायी बनले. पक्षाच्या सभांचे आयोजन करणे, वॉलपेंटिंग करणे, हॅण्डबिले वाटणे, मोर्चे काढणे, छोट्या-मोठ्या सभेसमोर गोष्टी सांगणे, पोवाडे, लोकगीते म्हणून दाखविणे या सर्व गोष्टींमुळे कम्युनिस्ट वर्तुळात ते सर्वांना एकदम हवेहवेसे झाले. याच वेळी त्यांच्या तुकाराम या नावाचे अण्णा या नावात रूपांतर झाले.
मुंबईत पोटासाठी वणवण भटकत असताना अण्णांनी हमाल, बूट पॉलीशवाला, घरगडी, हॉटेल बॉय, कोळसे वाहक, डोअरकीपर, कुत्र्याला सांभाळणारा, मुलांना खेळविणारा, उधारी वसूल करणारा, खाण कामगार, ड्रेसिंगबॉय अशी नाना प्रकारची कामे केली. यावरून त्यांच्या कष्टमय जीवनाची आपल्याला कल्पना येते. या काळातच त्यांना सिनेमा पाहण्याचा छंद लागला. या छंदानेच त्यांना साक्षर बनविले. चित्रपटांच्या पाट्या, रस्त्यावरील दुकानांच्या बोर्डवरील अक्षरे जुळवित ते साक्षर झाले. या अक्षर ओळखीनंतरच त्यांना वाचनाची आवड निर्माण झाली.
वयाच्या १७-१८ व्या वर्षी संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी अण्णांवर आली होती. गिरणी कामगार म्हणून त्यांच्या जीवनाला सुरुवात झाली होती. परंतु कोहिनूर मिलमधील नोकरी सुटल्याने त्यांच्यावर मोठेच संकट आले. या वेळी पुन्हा साठे कुटुंब वटेगावला आले. मुंबईतील धकाधकीचे जीवन, मोर्चे, सभा, सत्याग्रह, आंदोलने या सर्व गोष्टी पाहिलेल्या अण्णा भाऊंना वटेगावमध्ये राहणे शक्य होत नव्हते. अत्यंत अस्वस्थतेत त्यांनी घर सोडले आणि ते त्यांच्याच नातेवाईकांच्या तमाशाच्या फडात सामील झाले. अण्णा भाऊंचा धारदार आवाज, त्यांचे पाठांतर, पेटी, तबला, ढोलकी, बुलबुल ही वाद्ये वाजवण्याची कला या गुणांमुळे त्यांचे तमाशात स्वागतच झाले. महाराष्ट्राच्या तमाशा या कलेच्या परंपरेत मातंग समाजाने जी वैशिष्ट्यपूर्ण भर घातली ती शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या सहभागानेच. महाराष्ट्रातील लोकांना या वारणेच्या वाघाचे दर्शन पहिल्यांदा तमाशातच झाले. तमाशासारख्या कलेला अधिक प्रसिद्धी, प्रतिष्ठा, व समृद्धी अण्णा भाऊंनीच मिळवून दिली.
भारतीय स्वातंत्र्य चळवळीसह संयुक्त महाराष्ट्र चळवळीत, तसेच गोवा मुक्ती संग्रामाच्या वेळीही त्यांनी जनजागृतीचे प्रचंड काम केले. एक कलाकार म्हणून तसेच एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणूनही ते प्रत्येक उपक्रमात, आंदोलनात सहभागी होत असत. चलेजाव चळवळीच्या काळात वटेगावातही बर्डे गुरुजींच्या नेतृत्वाखाली अनेक घडामोडी सुरू होत्या. अण्णा भाऊ त्यात सामील असल्याने त्यांच्यावर वॉरंट निघाले. परिणामी त्यांनी कायमचे घर सोडले. पुढे त्यांना तत्त्वज्ञानाची, विचारांची एक दिशा मिळत गेली आणि त्यांनी कम्युनिस्ट पक्षाचे पूर्णवेळ काम करायला सुरुवात केली. पक्ष कार्यासाठी झोकून दिलेले असतानाच १९४४ साली त्यांनी ’लाल बावटा’ या कला पथकाची स्थापना केली. या वेळी शाहीर अमर शेख, शाहीर गव्हाणकर हे देखील त्यांच्या समवेत होतेच. या माध्यमातूनच त्यांच्या लिखाणाला सुरुवात झाली. लावण्या, पोवाडे, पथनाट्ये म्हणजे त्यांच्या ललित साहित्याची पूर्वतयारी होती. त्यांनी एकूण सुमारे १५ वगनाट्ये लिहिली व त्यातूनच त्यांना प्रसिद्धीही मिळत गेली.
१९४५ च्या दरम्यान मुंबईत अण्णांच्या आयुष्याला काहीशी स्थिरता लाभली. लोकयुद्ध साप्ताहिकात वार्ताहराचे काम करीत असताना त्यांनी अकलेची गोष्ट, खापर्या चोर, माझी मुंबई अशी गाजलेली लोकनाट्ये लिहिली. या काळातच संत साहित्यासह अनेक प्रतिभावंतांच्या अभिजात कलाकृती त्यांनी वाचून काढल्या. वैचारिक आणि कलाविषयक वाचनाची समृद्ध लेखक व्हायला त्यांना मदत झाली. अण्णांचे लेखक म्हणून यशाचे रहस्य म्हणजे त्यांनी नेहमी सामान्य वाचकाच्या मनाची व्यथा मांडली. सामान्य वाचकालाच प्रमाण मानल्याने वस्तुनिष्ठ असलेले त्यांचे साहित्य वाचकांच्या गळ्यातील ताईत बनले.
१९५० ते १९६२ हा त्यांचा साहित्य क्षेत्रातील सुवर्णकाळ होता. याच काळात त्यांच्या पुस्तकांच्या अनेक आवृत्ती निघाल्या. प्रचंड यशस्वी होत असताना त्यांचे स्वत:चे जीवन मात्र धकाधकीचे होत होते. मुंबई सरकारने ’लाल बावटा’ या कला पथकावर बंदी घातली होती. पुढे तमाशावरही बंदी आली. तमाशातील कलाकारांचे संसार देशोधडीला लागले. अण्णांनी तमाशाचे लोकनाट्यात रूपांतर करून तमाशा कलेचा उद्धार केला. तमाशाला लोकनाट्याचे वैभव मिळवून दिल्याने सरकारची बंदी कुचकामी ठरली.
या सुवर्णकाळातच त्यांनी वैजयंता, माकडीचा माळ, चिखलातील कमळ, वारणेचा वाघ, फकिरा अशा अनेक कादंबर्या लिहिल्या. ३०० च्या वर कथा लिहिल्या. खुळंवाडी, बरबाह्या कंजारी, कृष्णाकाठच्या कथा असे त्यांचे कथासंग्रहही प्रसिद्ध आहेत. त्यांनी स्टॉलीनग्राडचा पोवडा, महाराष्ट्राची परंपरा, मुंबईचा कामगार असे पोवाडेही लिहिले. निवडणुकीत घोटाळे, दुष्काळात तेरावा, अकलेची गोष्ट ही त्यांची वगनाट्ये प्रसिद्ध आहेत. दोनशे-अडीचशे गाणी, लावण्या त्यांनी लिहिल्या आहेत. कामगारांमध्ये त्यांची गाणी आणि लावण्या लोकप्रिय आहेत.
मराठीतील ग्रामीण, प्रादेशिक, दलित साहित्यावर अण्णा भाऊंचे प्रभुत्व होते. अण्णा भाऊंच्या साहित्याचे हिंदी, गुजराती, उडीया, बंगाली, तमीळ, मल्याळी या भारतीय भाषांबरोबरच रशियन, झेक, पोलीश, इंग्रजी, फ्रेंच अशा जगातील २७ भाषांमधे भाषांतर झाले आहे. लेखणीचे हत्यार बनवून त्यांनी पुरोगामी, विज्ञाननिष्ठ, स्त्रीवादी, लढाऊ अविष्काराचा दीपस्तंभ मराठी साहित्याच्या क्षेत्रात उभा केला. एवढ्या मोठ्या कर्तृत्वामुळे त्यांना प्रसिद्धी मिळत होती. अण्णांच्या १२ कथांवर चित्रपट निघाले. एवढे साहित्य प्रसिद्ध झाले तरी त्यांचे दारिद्रय संपले नाही. लक्ष्मी त्यांना प्रसन्न नव्हती. ते मितभाषी असल्याने व्यावहारिक बाबतीत लोकांनी त्यांचा गैरफायदा घेतला. परंतु चित्रपट सृष्टीतील भालजी पेंढारकर, सूर्यकांत मांढरे, जयश्री गडकर, सुलोचना यांसारख्या दिग्गज कलाकारांनी अण्णांवर खूप प्रेम केले. हिंदी चित्रपट सृष्टीतीलही राजकपूर, शंकर, शैलेंद्र, बलराज सहानी, गुरुदत्त, उत्पल दत्त या कलाकारांचे अण्णांवर प्रेम होते. ऑलेगसारखे रशियन कलावंतही अण्णा भाऊंचे मित्र होते.
लौकिक अर्थाने कोणतेही शिक्षण न घेता साहित्य क्षेत्रात जगप्रसिद्ध झालेला हा कलाकार काही दुर्दैवी (वैयक्तिक कौटुंबिक) संघर्षांमुळे खचत गेला. त्यांच्या शेवटच्या काळात महाराष्ट्र सरकारने त्यांना बरेच सहकार्य केले. मनाने खचल्यानेच १८ जुलै, १९६९ रोजी अण्णा भाऊंचे निधन झाले. त्यांच्या साहित्याच्या व कार्याच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक अन्यायामुळे जो समाज शैक्षणिक, सांस्कृतिक व आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे, त्या समाजामध्ये आत्मविश्र्वास व प्रगतीची आस निर्माण केली.
वैयक्तिक दु:खांचा विचार न करता;
आपले विचार, कार्य व प्रतिभा यांच्या साहाय्याने लोककलेला प्रतिष्ठा
प्राप्त करून देणारे आणि वंचितांच्या व्यथा प्रभावीपणे मांडणारे लोकशाहीर!

याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)